13 फोर अन् 13 सिक्स... हेनरिच क्लासेनने केला कांगारूंचा `खेळ खल्लास`, डेव्हिड मिलरची साथ अन् कुटल्या तब्बल 416 धावा!
SA VS AUS, Heinrich Klaasen : गोलंदाजांना चेंडू कुठं टाकावा याचं भान उरलं नाही. मैदानाचा एकही कोपरा उरला नाही, जिथं क्लासेनने चेंडू भिरकवला नाही. फास्टर असो वा स्पिनर क्लासेनने कोणालाच सोडलं नाही.
Heinrich Klaasen Century : क्रिकेटमध्ये असे खूप कमी सामने होतात, जे पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं... असाच एक सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (SA VS AUS) यांच्यात पहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाला हा निर्णय महागात पडला. क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी दमदार सुरूवात करून दिली. मात्र, कॅप्टन मार्करामला मोठी खेळी करता आली नाही. पिचची कंडिशन पाहता क्लासेनने (Heinrich Klaasen) आक्रमक सुरुवात केली. फक्त ५७ चेंडूत क्लासेनने शतक ठोकलं. त्यावेळी त्याने विराट कोहलीचा रेकाॅर्ड मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने सर्वात फास्ट शतक ठोकलं होतं. त्याचा रेकाॅर्ड आता क्लासेनेने मोडीस काढलाय. सुरूवात चांगली झाल्यानंतर क्लासेनने घेर बदलले.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ३२ ओव्हरमध्ये १५७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर क्लासेन आणि डेव्हिड मिलर याची जोडी जमली. त्यानंतर १८ ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने २५९ धावा कुटल्या. यामध्ये क्लासेनने १३ सिक्स अन् १३ फोर कुटल्या. तर डेव्हिड मिलरने देखील ४५ बाॅलमध्ये ६ फोर आणि ५ सिक्स मारले. मिलरने ८२ धावांची नाबाद खेळी केली.
पाहा VIDEO
क्लासेन याने मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मायकेल नेसर, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड यांना चेंडू कुठं टाकावा याचं भान उरलं नाही. मैदानाचा एकही कोपरा उरला नाही, जिथं क्लासेनने चेंडू भिरकवला नाही. फास्टर असो वा स्पिनर क्लासेनने कोणालाच सोडला नाही. रोहित शर्माने जशी श्रीलंकेविरुद्ध द्विशतक ठोकताना खेळी केली होती. त्याच अंदाजात क्लासेनने मैदानाचं वातावरण बदललं. त्यामुळे आता त्याची चर्चा होताना दिसत आहे.
आणखी वाचा - Shubhman Gill : बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचा नागिन डान्स; ठोकलं धमाकेदार शतक!
साऊथ अफ्रिका - क्विंटन डी कॉक (WK), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (C), मार्नस लॅबुशॅग्ने, अॅलेक्स केरी (WK), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मायकेल नेसर, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.