SA vs BAN, 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa vs Bangladesh 2nd Odi ) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
मुंबई : दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa vs Bangladesh 2nd Odi ) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. बांगलादेशने आफ्रिकेला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 195 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. आफ्रिकेने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 37.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. (sa vs ban 2nd odi south africa beat bangladesh by 7 wickets at the wanderers stadium johannesburg)
आफ्रिकेकडून ओपनर बॅट्समन क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. काइल वेरेनने नाबाद 58 धावा केल्या. कॅप्टन टेम्बा बावुमाने 37 धावांचं योगदान दिलं. तर जानेमन मलानने 26 रन्स केल्या.
बांगलादेशकडून मेहदी हसन, शाकिब अल हसन आणि अफिफ हुसैनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
तिसरा आणि निर्णायक सामना केव्हा?
मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकून विजयी सलामी दिली. यानतंर आफ्रिकेने आजचा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली.
त्यामुळे आता तिसरा आणि शेवटचा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आणि तितकाच रंगतदार होणार आहे. हा तिसरा सामना 23 मार्चला सेंचुरियनमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिका कोण जिंकतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
आफ्रिका प्लेइंग इलेव्हन | जानेमेन मालन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कॅप्टन), काइल वेरेन, रस्सी वैन डेर डूसन, डेविड मिलर, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि तबरेज शम्सी.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | तमीम इकबाल (कर्णधार), लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), यासिर अली, महमूदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहदी हसन, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.