दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : बातमी दोन क्रिकेटवीर मित्रांची.....मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मैत्रीनंतरच्या मतभेदाच्या बातम्या तुम्ही अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र दोघांची पुन्हा गट्टी जमल्याची बातमी तुम्ही ऐकली आहे का? नाही ना? आम्ही घेऊन आलोय ही सुखवार्ता.



निमित्त होतं विनोद कांबळीचा वाढदिवस....बीकेसीच्या एमसीएत विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क सचिन तेंडुलकर अवतरला...आणि विनोदला वाढदिवसाचं मेमोरेबल गिफ्ट मिळालं.


याच संदर्भात विनोद कांबळीनं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्या संवाद साधत सचिनबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या.