Sachin Bhargo: भारतीय खो-खो महासंघ पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. खो-खो चे खेळाडू जागतिक स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. खेळात आपले नाव कमावणारा सचिन भार्गो देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे. सचिनचा इथवरच प्रवास सोपा न्हवता. अनेक संघर्षातून उभा  राहिलेला सचिन आता खो-खो विश्वचषक खेळणार आहे. 


प्रशिक्षकांनी केली मदत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका शेतकरी कुटुंबातील सचिनला त्याच्या क्रीडा कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. यानंतरही या तरुणाने आपल्या प्रशिक्षकाच्या मदतीने त्याच्या सर्व अडचणींवर मात केली. तो खो-खो सोडण्याच्या मार्गावर गेला होता. तेव्हा त्याच्या प्रशिक्षकाने त्याला पाठिंबा दिला आणि त्याला त्याच्यासोबत राहण्यासाठी आमंत्रित केले. 


'असा' होता संघर्ष 


सचिनने सांगितले की, "मी मध्य प्रदेशमधील लहानश्या देवास शहरात राहयचो. पण, माझ्या आजी आजोबांच्या निधनानंतर आमची शेती सांभाळायला कोणी न्हवतं. त्यामुळे माझे आई वडील आणि बाकीचे कुटुंबीयांनी गावी जायचा निर्णय घेतला. त्या वेळी ला गावी जायचे न्हवते. मी कुठे आणि कसे रहावे याबाबत अनेक समस्या होत्या. माझ्या आई वडिलांनी मला त्यांच्यासोबत गावी येण्यास सांगितले. पण, मला खो-खो खेळायचे होते. मी हे माझ्या घरच्यांनाही संगितले. यावेळी मला काहीच सुचत न्हवते. त्यावेळी मी माझ्या सरांना म्हणेज प्रवीणजी सांते यांना बोलावले. त्यांना विचारले मला खेळायचे आहे, मी काय करु ? तेव्हा माझे सर म्हणाले, तुझी बॅग बांध आणि माझ्या घरी ये. त्यानंतर मी एक वर्ष त्यांच्या घरी राहिलो." 


तेलुगु योद्धाने केले खरेदी 


सचिनला अल्टिमेट खो-खो लीगच्या पहिल्या सत्रात तेलुगु योद्धाचे मुख्य प्रशिक्षक सुमित भाटिया यांनी खरेदी केले. त्यानंतर त्याने चौथ्या आशियाई खो-खो अजिंक्यपद स्पपर्धेतून भारतासाठी पदार्पण केले. खो-खो विश्वचषकाचे कौतुक करताना सचिन म्हणाला, "मी खो-खो विश्वचषकासाठी खूप उत्सुक आहे. या स्पर्धेसाठी माझी निवड व्हायला हवी. मी विश्वचषक स्पर्धेत खेळलो, तर माझे कुटुंब, प्रशिक्षक आणि चाहते यांना खूप आनंद होईल. या विश्वचषकामुळे खो-खो खेळाला मोठा पाठिंबा मिळणार आहे. अनेकजण या खेळाबाबत प्रश्न उपस्थित करतात. तर काहींना खो-खो खेळाची माहितीही नसते. या स्पर्धेमुळे त्यांनाही कळेल की खो-खो किती चांगला खेळ आहे. ज्या प्रमाणे क्रिकेट, फुटबॉल, हॉकीची जाण आपल्या देशवासियांना आहे, तशी खो-खो या खेळाची जाण या स्पर्धेमुळे व्हावी अशी माझी इच्छा आहे." 


खेळासाठीचे मेहनत 


या खेळासाठी व्यायामाची दिनचर्या राखण्याचे महत्व आणि खो-खो महासंघाद्वारे क्रीडा शास्त्राचा खेळामध्ये कसा परिचय करुन दिल्यामुळे दुखापती होण्याची शक्यता कमी झाल्याचेही सचिनने सांगितले. हे खूप उपयुक्त आहे. बरेच खेळाडू दररोज स्ट्रेंथ वर्कआऊट करतात. परंतु रोज असे केल्याने स्नायूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. उलट दुखापती वाढण्याची शक्यता अधिक असते. यामुळे खेळाडूचीही कामगिरीही परिणाम होतो. म्हणून व्यक्तीचे शरीर आणि सामर्थ्य समजून घेण्याचा एक चांगला मार्ग क्रीडा शास्त्राने निर्माण केला आहे." 


पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा १३ ते १९ जानेवारी दरम्यान, नवी दिल्ली येथे होणार असून, स्पर्धेत एकूण २४ देश सहभागी होणार आहेत.