मुंबई : 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज आहे. फक्त यावेळी त्याचा अंदाज काहीसा वेगळा आणि तितकाच प्रभावी असेल. क्रिकेट सामन्यांपूर्वी होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणारा सचिन आता चक्क समालोचन कक्षात दिसणार आहे. इंग्लंड आणि  दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या वेळी त्याचा हा अंदाज पाहता येणार आहे. लंडनमधील ओव्हल स्टेडियम येथे हा सामना खेळण्यात येणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिलिप ह्यू क्रिकेट लाईव्ह प्री- शो (हिंदी आणि इंग्रजी) मध्ये तो सहभागी होणार आहे. ज्यामध्ये तो `Sachin Opens Again` या त्याच्या स्वत:च्या खास कार्यक्रमाची धुरा सांभाळताना दिसेल. सचिनसोबतच मैदान गाजवणारे काही खेळाडू त्याच्यासोबत दिसणार आहेत. त्यामुळे क्रीडारसिकांसाठी ही परवणीच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


'स्टार स्पोर्स्ट्स'च्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली. 'व्हॉईस ऑफ गॉड....' असं एक छायाचित्र ज्यावर सचिन शतक ठोकल्यानंतर क्रीडारसिकांना अभिवादन करतानाचा फोटो पाहायला मिळत आहे. सचिनचा हा एकंद अंदाज आणि त्याची ही नवी इनिंग पाहता आयला! सचिन कॉमेंट्री करणार, अशी आश्चर्यकारक आणि तितकीच आनंदाची प्रतिक्रीया क्रीडा रसिकांकडून देण्यात येत आहे.