मुंबई : टीम इंडियाच्या सर्वोत्कृष्ट बॅट्समनच्या यादीत वीवीएस लक्ष्मण याचं नावं असल्याशिवाय ती यादीत पूर्ण होणार नाही. त्याची बॅटींग इतकी जबरदस्त होती की, ऑस्ट्रेलियाचा महान खेलाडू इयान चॅपने याने त्याला वॅरी वॅरी लक्ष्मण म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज बुधवारी १ नोव्हेंबरला तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याला सोशल मीडियातून अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही खास शुभेच्छा दिल्या आहेत. 


सचिन आणि लक्ष्मण बराच मोठा काळ एकत्र क्रिकेट खेळले. त्यामुळे सचिनला त्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना लक्ष्मणच्या अनेक खास गोष्टी माहिती आहेत. सचिनने लक्ष्मणला शुभेच्छा देताना त्याच्याबद्दलचा एक खुलासाही केलाय. त्याने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्ष्मण...काय मी यानिमित्ताने तुझ्या रन बनवण्याच्या क्षमतेचा खुलासा करू शकतो? तुझ्या यशाचं गुपित सामन्याआधी आधी अंघोळ करणे आणि नंतर एक सफरचंद खाणे.



लक्ष्मण हा शाकाहारी आहे. तो साईबाबाचा भक्त आहे. लक्ष्मणने सर्वात जास्त जर कुणाची धुलाई केली असेल तर ती ऑस्ट्रेलियन टीमची. तेव्हाची टीम ही अशी टीम होती जी विजयासोबत प्रत्येक दिवशी नवीन रेकॉर्ड करत होती. 


स्टीव वॉ च्या नेतृत्वात जगभरात ऑस्ट्रेलियाच्या टीमचा दबदबा होता. पण लक्ष्मण कधीही त्यांच्या दबावात नव्हता. जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्याने कांगारू गोलंदाजांची धुलाई केली आहे. लक्ष्मणने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण १११२५ रन्स केले. यातील ३१७३ रन्स त्याने एकट्या ऑस्ट्रेलिया विरोधात केले आहेत. यातही २००० रन्स त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये केले आहेत. ४ शतकंही त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच केले आहेत. सचिननंतर लक्ष्मण हा दुसरा खेळाडू आहे ज्याने ऑस्ट्रेलिया विरूद्ध २ हजारांपेक्षा जास्त रन्स केले आहेत.