मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022)अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulakar) पदार्पण करेल, अशी अपेक्षा होती, मात्र ते शक्य शक्य झालं नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये एकूण 22 खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. मात्र, अर्जुनसह एकूण तिघांवर टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवला नाही.  आता मुंबईचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर सचिन तेंडुलकरने आपल्या मुलाला खास सल्ला दिला आहे. (sachin tendulkar 1st reaction over to his son arjun tendulakar has not given debut chance in ipl 2022)


सचिनचा अर्जुनला सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनला मी नेहमीच एवढंच सांगतो की सध्याचा मार्ग हा आव्हानात्मक आणि खडतर असणार आहे. तुला क्रिकेट आवडते म्हणून तू क्रिकेट खेळायला सुरुवात केलीस. असे करत राहा आणि मेहनत करत राहा, त्याचे परिणाम नक्कीच समोर येतील", असं सचिन यूट्युब शो सचइनसाईटमध्ये  म्हणाला. 
 
"जर टीम सिलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, मी संघ निवडण्यात कधीच सहभागी नव्हतो. मी या सर्व गोष्टी टीम मॅनेजमेंटवर सोडतो. कारण मी नेहमीच असंच काम केलंय", असं सचिनने नमूद केलं.  


रणजी टीममध्येही संधी नाही


अर्जुनला मुंबईने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा ऑक्शनमधून 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. अर्जुन 2021 मध्ये 'पलटण'चा भाग होता.  पण तेव्हाही त्याला डेब्यूची संधी मिळाली नाही. 


अर्जुनने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी दोन टी-20 सामने खेळले आहेत. मात्र, रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी अर्जुनची संघात निवड झालेली नाही.