मुंबई  : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आपल्या खेळासाठी जगभरात ओळखला जातो. आज जगभरातील लाखो नवोदित क्रिकेटर्सचा कोहली हा आदर्श आहे. पण ज्या क्रिकेटर्सना बघून कोहली क्रिकेट खेळला त्यांच्याबद्दल जाणून घेवूया. सचिन तेंडुलकरचा मोठा प्रभाव कोहलीवर दिसायचा म्हणून ८ वर्षाच्या विराट कोहलीला त्याचे वडिल दिल्लीच्या क्रिकेट स्कूलमध्ये सोडून आले. पुढे जाऊन हाच कोहली सचिनच्या रेकॉर्डच्या जवळ पोहोचलाय. हे सर्व करण्यामागे कोहलीची मेहनतही तितकीच आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कोहलीला कोणापासून प्रेरणा मिळायची आणि कोणाचे पोस्टर्स तो आपल्या घरी लावायचा याबद्दल अनेकांना माहिती नसेल.


शॅम्पेन गिफ्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एका मुलाखतीत सचिनने म्हटलं की, 'जर विराट वनडेमध्ये माझा शतकांचा रेकॉर्ड मोडेल तर मी त्याला शॅम्पेन गिफ्ट करेल.' विराट कोहलीने आतापर्यंत वनडे करिअरमध्ये 35 शतक ठोकले आहेत. सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला अजून 25 शतकांची गरज आहे. सचिनला विचारण्यात आलं होतं की, जर विराट त्याचा हा रेकॉर्ड मोडतो तर शॅम्पेनच्या 50 बाटल्या तो विराटला पाठवेल का?. यावर बोलतांना सचिनने म्हटलं की, 'नाही जर विराट हा रेकॉर्ड मोडतो तर मी स्वत: शॅम्पेनची बॉटल घेऊन त्याच्याकडे जाईल आणि त्याच्या सोबत सेलिब्रेट करेल.'


सचिनचा प्रभाव 


कोलकात्यामध्ये विराट कोहलीने म्हटलं होतं की, 'त्याच्या करिअरमध्ये सचिन तेंडुलकरचा प्रभाव आहे. माझ्या करिअरमध्ये खूप कमी लोकं माझ्या जवळ आहेत. हा एक जीवनप्रवास होता जो चालतच गेला. आणि हे स्वाभाविक आहे की, माझ्या कठीण काळात जो माझ्य़ा सोबत उभा राहिला तर मी त्याला महत्त्व देईल. आज मी जे काही आहे ते सचिनच्या प्रेरणेमुळे आहे. माझ्यासाठी स्वर्गापर्यंत पोहोचण्याची ती पायरी आहे. मिळवणं आणि जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाची नाहीत. जर कोणी माझ्यासाठी ईमानदार आहे तर हे महत्त्वपूर्ण आहे.'


द्रविडचेही पोस्टर 


कोहली सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे पोस्टर आपल्या खोलीत लावायचा. 'एआयबी' ला कोहलीने दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केलाय. सचिनची आक्रमकता आणि द्रविडचा डिफेन्स बघून कोहलीने आपल्या बॅटींगमध्ये बदल केल्याचेही तो सांगतो. त्याच्या अशा गुणांमुळेच तो जगभरातील मोजक्या गुणी खेळाडूंमध्ये गणला जातो.