Arjun Tendulkar Coach : महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुनला (Arjun Tendulkar) अजुनही आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुन सध्या चंदीगडमध्ये असून तो अखिल भारतीय जेपी अत्री स्मृती क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आला आहे. यादरम्यान अर्जुन एका विश्वविजेत्या खेळाडूच्या वडिलांकडून प्रशिक्षण देत असल्याचं समोर आलं आहे. (Arjun Tendulkar is Being Trained By the Father of The World Champion Player Yuvraj Singh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक दुसरे तिसरे कोणी नसून 2011 वर्ल्डकपमधील 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' मिळवलेल्या किताबाचा मानकरी ठरलेल्या युवराज सिंगचे वडील आहेत. (Arjun Tendulkar New Coach) योगराज सिंग (Yograj Singh) अर्जुनला क्रिकेटचे धडे देत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. याबाबत योगराज सिंग यांनी इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. 


 



 



योगराज सिंग यांची प्रशिक्षक म्हणून खास ओळख आहे. सिक्सर किंग युवराजसारखा (Sixer King Yuvraj Singh) स्टार खेळाडू टीम इंडियाला मिळाला यामध्ये योगराज यांचा मोलाचा वाटा आहे. 1980 च्या दशकामध्ये योगराज सिंग यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. मात्र जास्त काळ भारतीय संघामध्ये आपली जागा पक्की करू शकले नाहीत. 


अर्जुनला अद्याप प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. मात्र अर्जुनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 23 वर्षाच्या अर्जुनसाठी भारतीय संघाची दारे केव्हा उघडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.