विश्वविजेत्या U19 टीमला सचिनने दिल्या अशा शुभेच्छा
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे..
माउंट मौंगानुई : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे..
अंडर 19 टीमवर आता शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला आहे. सगळीकडूनच भारतीय टीमला शुभेच्छा येत आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेक.
पाहा काय बोलला सचिन
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली होती. ऑस्ट्रेलियाच्या झटपट विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली.
भारताला दूसरा झटका 131 रन्सवर लागला. शुभमान गिल 31 वर आऊट झाला. परम उप्पलने त्याला बोल्ड केलं. याआधी 71 रनच्या स्कोरवर भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ 29 रनवर आऊट झाला. त्यानंतर भारताच्या मनजोत कालराने जबरदस्त खेळी करत भारताला विजयाच्या दिशेने पुढे नेण्यात जबरदस्त कामगिरी केली.