मुंबई : मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC)ने क्रिकेटच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आधुनिक क्रिकेटला अजून उत्तम आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे नियम बदलण्यात आले होते. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बदललेल्या एका नियमाचं कौतुक केलं आहे. मात्र याच नियमाला इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने हा नियम योग्य नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी सचिन आणि ब्रॉड यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं दिसून आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसीसीने 38.3 लॉमध्ये सुधारणा केली आहे. हा नियम 41 (अयोग्य खेळ) वरून 38 (रनआऊट) वर हलवण्यात आला आहे. यानुसार, जर गोलंदाजाने गोलंदाजी करण्यापूर्वी लगेच नॉन स्ट्रायकरवर उभा असलेला खेळाडू क्रीजमधून बाहेर आला आणि गोलंदाजाने स्टंपवर चेंडू मारला, तर नॉन-स्ट्रायकरला आऊट दिलं जाईल. यापूर्वी ते रनआऊट श्रेणीत नव्हतं.


स्टुअर्ट आणि ब्रॉडमध्ये मतभेद


सचिन तेंडुलकरच्या म्हणण्याप्रमाणे, अशा पद्धतीने आऊट करणाऱ्या प्रकाराला ‘मांकेड़िंग’शब्द वापरला जात होता आणि मला तो योग्य वाटत नव्हता. सचिनने यासंदर्भात एक व्हिडीयो शेअर केला आहे.


या व्हिडीयोमध्ये सचिन म्हणतो, MCC समितिने क्रिकेटचे नवे नियम जाहीर केले आहेत. यामधील अनेक बदललेल्या नियमांचं मी समर्थन करतो. यापैकी एक म्हणजे मांकेड़िंग पद्धतीने आऊट करणं. याला मांकेड़िंग म्हणणं मला योग्य वाटतं नव्हतं. मला आनंद आहे याला आता रनआऊट म्हणून समजलं जाणारा आहे. माझ्या मताप्रमाणे हे पहिल्यापासूनच रन आऊटमध्ये गणना केली पाहिजे होती.


दरम्यान ‘मांकेडिंग’ला वैध करणाऱ्या एमसीसीच्या नियमाला योग्य नसल्याचं ब्रॉड म्हटलं आहे. अशा पद्धतीने आऊट करण्यासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नसल्याचं मत ब्रॉडने व्यक्त केलं आहे.


यावर ट्विट करत ब्रॉड म्हणाला, आता  मांकेडिंग चुकीचं नाहीये. आऊट करण्याची ही पद्धत वैध करण्यात आली आहे. मात्र मला नाही वाटतं हे बरोबर आहे आणि मी याला योग्य मानत नाही. कारण अशा पद्धतीने आऊट करण्यासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नसते.