नवी दिल्ली : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर विरोधात कुणी भाष्य केलं तर त्याला सोशल मीडियात नेहमीच ट्रोल करण्यात येतं. मात्र, आता स्वत: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यात आलं आहे.


श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारली. ही मॅच खूपच खास ठरली कारण टेस्ट इतिहासातील हा सर्वात मोठा विजय होता. भारतीय टीमने १ इनिंग आणि २३९ रन्सने श्रीलंकेने पराभव केला.


सचिन तेंडुलकरने केली चूक


नागपूर टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने मिळवलेल्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय टीमचं अभिनंदन केलं. मात्र, या दरम्यान सचिन तेंडुलकरने एक चूक केल्याचं पहायला मिळालं.


...आणि सचिन 'त्याला' विसरला


तेंडुलकरने ट्विटमध्ये पूर्ण टीमचं अभिनंदन करत कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, मुरली विजय आणि आर अश्विन यांचं नाव घेतलं. मात्र, चेतेश्वर पुजारा याच्या योगदानाला सचिन तेंडुलकर विसरला.



यानंतर ट्विटर युजर्सने सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पुजाराचं नाव न घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले.



यानंतर एका युजरने लिहिलं की, तुम्ही मिस्टर डिपेंडेबलला कसं विसरु शकता?







या मॅचमध्ये भारतीय टीमकडून चार बॅट्समनने सेंच्युरी लगावली. विराट कोहलीने २१३ रन्स केले. चेतेश्वर पुजाराने १४३ रन्स, मुरली विजयने १२८ रन्स आणि रोहित शर्माने नॉट आऊट १०२ रन्स केले.