मुंबई : ६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १६ मार्च २०१२मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती जे आजपर्यंत कोणालाही जमलेले नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्ध शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये सचिनने कारकिर्दीतील शतकांचे शतक ठोकले होते. असा विक्रम करणारा सचिन पहिला क्रिकेट आहे. सचिनव्यतिरिक्त आतापर्यंत एकाही क्रिकेटरला ही कामगिरी करता आलेली नाहीये.


सचिनवगळता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर रिकी पॉटिंगने ७१ आणि श्रीलंकेचा कुमार संगकाराने ६३ शतके ठोकलीत. 


शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये सचिनने १४७ चेंडूत ११४ धावांची खेळी करत हा शानदार रेकॉर्ड आपल्या नावे केला. दरम्यान, भारत हा सामना हरला होता. मात्र सचिनच्या रेकॉर्डमुळे हा सामना आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. 



सचिनसाठी शतकांचा हा रेकॉर्ड करणे सोपी गोष्ट नव्हती. सचिनने ९९वे शतक वर्षभरापूर्वी साकारले होते. त्यानंतर वर्षभर त्याला शतक लगावता आले नव्हते. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सचिनने ही किमया साधली. २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. त्याने ४६३ वनडेत १८,४२६ धावा केल्या. यात त्याने ४९ शतके लगावली. तर २०० कसोटीत ५१ शतकांसह १५,९२१ धावा केल्या.