सचिन तेंडुलकर या मानाच्या यादीत, लंडनमध्ये केले सन्मानित
या मानाच्या यादीत आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे.
लंडन : 'हॉल ऑफ फेम' या मानाच्या यादीत आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे. या यादीत स्थान मिळालेला सचिन हा सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिनच्या नावाचा समावेश करण्यात आल्यानंतर सचिनवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
तसेच सचिनसोबत दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे. याआधी आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये पाच भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. यात क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे यांचा समावेश आहे.
सचिन, डोनाल्ड, कॅथरिनसह तिघांचा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आल्यानंतर लंडनमध्ये एका कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.