मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या टीमला या सिझनमध्ये 5 सामने जिंकता आले नाहीत. इतकंच नाही तर अर्जुन तेंडुलकरचा टीममध्ये एकदाही समावेश न केल्याने चाहतेही नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने याबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. सचिनच्या म्हणण्याप्रमाणे, अर्जुनसाठी हा रस्ता खूप कठीण जाणार असून त्याला खूप मेहनत करावी लागणार असल्याचं चाहत्यांना सांगितलंय.


सचिन तेंडुलकरने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यामध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता दरम्यान, अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर एका चाहत्याने त्याला प्रश्नही केला होता.


चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना मास्टर ब्लास्टर म्हणाला, 'हा वेगळा प्रश्न आहे. मला काय वाटतं किंवा मी काय विचार करतो हे अजिबात महत्त्वाचं नाही. असो, पण आता आयपीएलचा सिझन संपला आहे.


महान फलंदाज सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना पुढे म्हणाला की, तो मुंबई इंडियन्सच्या निवडीत अजिबात हस्तक्षेप करत नाही. या सगळ्याची जबाबदारी तो टीम आणि व्यवस्थापनावर टाकतो. कारण त्याला त्याचं काम करायला आवडतं.


मेगा ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतलं. पण त्याला एकंही सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या सिझनमध्येही त्याने एकंही सामना खेळला नव्हता.