मुंबई : भारत रत्न सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील 'बाप' माणूस. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भावूक झाला. क्रिकेट विश्वात रमणारा आणि क्रिकेट वेडा असणारा सचिन एका लहान मुलाचा व्हिडिओ पाहून भावूक झाला. त्याने हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. या मुलाकडून मला नवीन वर्षाची प्रेरणा मिळाली आहे. तुम्हालाही प्रेरणा मिळेल, असे ट्विट करताना मास्टर ब्लास्टर सचिनने केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानावरचा राजा भावूक का झाला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा भावून व्हाल आणि तुम्हालाही खरी प्रेरणा मिळेल. क्रिकेट खेळण्याची त्या लहानग्या मुलाची जिद्द बघून मास्टर ब्लास्टर भावूक झाला. नवीन वर्ष सुरू झाले आणि मास्टब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या ट्विटरवर नवीन वर्षांनिमित्त एक प्रेणादायी व्हिडिओ शेअर केला आहे.


अपंगत्वावर मात करून क्रिकेट खेळण्याची आवड जपणाऱ्या ' मददा राम ' या मुलाचा क्रिकेट खेळताना हा व्हिडिओ आहे. त्याच्यासोबत त्याचे मित्रही तेवढ्याच आनंदाने खेळत आहेत. हा मद्दा राम कोणाची मदत न घेता खेळतो शिवाय तो धावा काढण्यासाठी प्रयत्नही करत आहे. त्याची जिद्द सर्वकाही सांगून जाते. आपल्या अपंगावर मात करुन क्रिकेट खेळाणाऱ्या या लहानग्याला पाहून मला प्रेरणा मिळाली. तुम्हालाही नक्की प्रेरणा मिळेल , असे सचिनने म्हटले आहे


 पाहा हा व्हिडिओ . . (सौजन्य : twitter/sachintendulkar)