`माझ्या संपूर्ण कारकिर्दीत....`, सचिन तेंडूलकरने केलं बीसीसीआयचं कौतूक, म्हणाला `ड्रेसिंग रुममध्ये...`
Sachin Tendulkar On Domestic Cricket : क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.
Sachin Tendulkar praised BCCI : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai In Ranji Trophy final) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शार्दूल ठाकूरच्या उल्लेखनिय कामगिरीमुळे मुंबईला विजय मिळवता आला. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटला (Domestic cricket) प्राधान्य देत असल्याने आता अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआयचं कौतूक केलंय. अशातच आता क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने (Sachin Tendulkar) देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला सचिन तेंडूलकर?
रणजी करंडक उपांत्य फेरीत चुरसाचे सामने पहायला मिळत आहेत. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत, मला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी मुंबईसाठी खेळण्याचा उत्साही राहिलो. मोठे झाल्यावर आमच्या ड्रेसिंग रुममध्ये जवळपास 7 ते 8 भारतीय खेळाडू होते आणि त्यांच्यासोबत खेळायला मजा आली, अशा आठवणी सचिनने सांगितल्या.
जेव्हा भारतीय खेळाडू त्यांच्या देशांतर्गत संघांसाठी खेळतात तेव्हा ते तरुणांसाठी खेळाचा दर्जा उंचावतात आणि कधीकधी नवीन प्रतिभा ओळखली जाते. हे राष्ट्रीय खेळाडूंना कधीकधी मूलभूत गोष्टी पुन्हा शोधण्याची संधी देते, असं सचिन म्हणतो.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी भाग घेतल्याने, काही कालावधीत, चाहते देखील त्यांच्या देशांतर्गत संघांना अधिक फॉलो आणि समर्थन करण्यास सुरवात करतील. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटला समान प्राधान्य देतं हे पाहून समाधान वाटलं, असं सचिनने म्हटलं आहे.
दरम्यान, रणजीचा दुसरा फायनलिस्ट मिळण्यासाठी उद्याची वाट पहावी लागणार आहे. मध्य प्रदेशला जिंकण्यासाठी 90+ धावांची गरज आहे, विदर्भाला 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे आता मुंबईविरुद्ध कोण खेळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.