नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वेस्ट इंडिजच्या विजयानंतर ब्रायन लाराला एक खास एमएमएस केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने SMS केल्याचं स्वत: ब्रायन लारा याने मान्य केलं आहे. वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ब्रायन लारा याने सांगितले की, सचिनने मला एक एसएमएस पाठवला आहे. इंग्लंडविरोधात दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमला मिळालेल्या विजयानंतर अभिनंदन केलं आहे.


ब्रायन लाराच्या मते, वेस्ट इंडिजच्या या विजयावर सचिनने म्हटलं की क्रिकेट जगताला याची आवश्यकता आहे.


वेस्ट इंडिजची टीम ७ सप्टेंबरपासून सुरु होणा-या तिस-या आणि शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळविण्यास उत्सुक आहे. या तिस-या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवत वेस्ट इंडिजची टीम सीरिजही आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. जर वेस्ट इंडिजच्या टीमने विजय मिळवला तर ते २० वर्षांनी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकतील.


दरम्यान, सीरिजमधील पहिली टेस्ट मॅच इंग्लंडने २०९ रन्सने जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय मिळवला.