सचिन तेंडुलकरचं WorldChildrensDay सेलिब्रेशन
२० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो.
मुंबई : २० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो.
भारतामध्ये बालदिन हा पंडीत नेहरूंच्या जन्मदिनी वेगळा साजरा केला जातो. पण जगभरात आजच्या दिवशी या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे.
क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून खास ट्विट केले आहे. सचिनाने त्याच्या मुलांचा खास फोटो शेअर केला आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिन तेंडुलकरने आता बराच वेळ त्याच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार सचिन घराकडे अधिक लक्ष देतो.
सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही सचिनची दोन मुलं आहेत. त्यांच्या बालपणीचा फोटो शेअर करताना मुलं किती पटकन मोठी होतात अशा आशयाचा एक मेसेज ट्विट केला आहे.
काय करतात सचिन तेंडुलकरची मुलं ?
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेट खेळतो. अंडर १९ च्या सामन्यांमध्ये तो आपली चुणूक दाखवतो. सोबतच सचिन त्याच्या खेळाकडे लक्ष ठेवून आहे. तर सचिनची मोठी मुलगी सारा तेंडुलकर सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार अशा बातम्या आल्या होत्या. मात्र तेंडुलकर परिवाराकडून अजूनही या वृत्ताला कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही.