मुंबई : क्रिकेटला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा सचिन तेंडुलकर आज अनेक युवा खेळाडुंसाठी गुरुच्या स्थानी आहे. सचिनला पाहुनच अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या विश्वात आपलं पाऊल ठेवलं. पण सचिन तेंडुलकरच्या यशामागे कोणाचा हात आहे हे त्याने आज गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत त्याच्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल सांगितले आहे. सचिनने म्हटलं की, 'मी जेव्ही ही बॅट उचलतो तेव्हा माझा पुढे तीन 3 लोकांचं नाव येतं. ज्यांचं माझ्या आयुष्यात खास महत्त्व आहे. मी जे आज आहे ते या 3 व्यक्तींमुळेच आहे. सगळ्यात आधी माझा भाऊ ज्याने मला आचरेकर सरांकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा बॅटींग करायला जायचो तेव्हा ते शारिरीकरित्या माझ्यासोबत नसायचे पण मानसिक रूपात ते नेहमी माझ्यासोबत होते. मी जेव्हाही बॅटींग करायला गेलो त्यांच्या सोबतच गेलो.''



आपल्या मोठ्या भावानंतर सचिनने त्याचे कोच आचरेकर सराचं नाव घेतलं. त्याने म्हटलं की, ''जेव्हा आचरेकर सरांबद्दल काय बोलू. त्यांनी माझ्या बॅटींगवर जे लक्ष दिलं. मॅच असो की सराव, ते माझ्या बॅटींगदरम्यानच्या सर्व चुका नोट करुन ठेवायचे. त्यानंतर ते तासनतास माझ्यासोबत यावर बोलायचे.'' 


शेवटी सचिनने आपल्या वडिलांचं नाव घेतलं. त्याने म्हटलं की, ''माझ्या वडिलांनी मला म्हटलं होतं की, कधी शॉर्टकट घेऊ नको. स्वत:ला चांगल्या प्रकारे तयार कर. यावर कधी आपले मुल्य कमी कमी नको होऊ देऊस.'