मुंबई: IPLआधी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुलाला मोठा धक्का बसला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या टुर्नामेंटआधी मुंबई संघातून बाहेर करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच विजय हजारे ट्रॉफीसाठी संघ आणि तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई संघाकडून अर्जुन तेंडुलकरचं नाव नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयपीएलआधी अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये संधी न दिल्यानं मोठा धक्का बसला आहे. 


विजय हजारे ट्रॉफी 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार तर पृथ्वी शॉ उप-कर्णधार आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव नसल्यानं मोठा धक्का बसला आहे. 
अर्जुन तेंडुलकरला का मिळाली नाही संधी?
अर्जुन तेंडुलकर यंदा प्रथमच वरिष्ठ संघात दाखल झाला होता. वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघात संधी देण्यात आली. त्याने लीट ई ग्रूप सामन्यातून पदार्पण केलं. दोन ओव्हरमध्ये केवळ 1 विकेट घेता आली. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं केलेली कामगिरी नाराज करणारी असल्यानं त्याला विजय हजारेसाठी संधी देण्यात आली नाही अशी एक चर्चा होत आहे. 


मुंबई संघात कोणकोण आहेत?
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, यशस्वी जायस्वाल, अखिल हेरवाडकर, सरफराज खान, चिन्मय शंकर, आदित्य तारे, हार्दिक तमोर, शिवम दूबे, आकाश पारकर, आतिफ अटवाल, आतिफ अटवाल अंकोलेकर, साईराज पाटील, सुजीत नायक, तनुश कोटियन, प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, आणि मोहित अवस्थी.