Arjun Tendulkar Viral Photo: सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नेहमी काही ना काही कारणान चर्चेत असतो. कधी क्रिकेटमुळे तर कधी आपल्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे अर्जुन तेंडुलकरची नेहमीच चर्चा असते. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने मैदानात खेळण्याची संधी दिलेला अर्जुन तेंडुलकर अद्यापही भारतीय संघात स्थान मिळण्याची वाट पाहत आहे. पण सध्या अर्जुन तेंडुलकर आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 
 
अर्जुन तेंडुलकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोशल मीडियावरुन अनेकदा तो आपले फोटो शेअर करत असतो. असाच एक फोटो त्याने सध्या शेअर केला असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या फोटोत असं काय आहे असा विचार तुम्ही करत असाल ना. याचं कारण या फोटोत अर्जुन तेंडुलकरने आपले सिक्स पॅक अॅब दाखवले असून त्याच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे. 2003 हे वर्ष अर्जुनसाठी चांगलं आहे. याचं कारण अर्जुनला या वर्षात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन तेंडुलकर नेहमी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असतो. यामुळे तो नेहमी जीममध्ये घाम गाळताना दिसतो. अर्जुन तेंडुलकरला जीममध्ये वेळ घालवणं फार आडवतं. त्याचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तर त्याने अनेकदा जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो शेअर केले आहेत. 



अर्जुन तेंडुलकर देवधर ट्रॉफी मध्ये दक्षिण क्षेत्राच्या संघात सहभागी असून, मयंक अग्रवाल संघाचं नेतृत्व करत आहे. अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, फलंदाजीही करतो. मागील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला मैदानात खेळण्याची संधी दिली होती. पण अर्जुन तेंडुलकर आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याला मोजक्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.



दरम्यान, भारतीय क्रिकट बोर्डाने ऑगस्ट महिन्यात एमर्जिंग ऑलराऊंडर शिबीरात त्याला संधी दिली आहे.