Sachin Tendulkar: दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा (World Tourism Day 2022) केला जातो. जगातील विविध भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) पर्यटनावर (Tourism) मोठं आव्हान आलं आहे. मात्र गेल्या वर्षभरात पर्यटन क्षेत्रात आश्चर्यकारक वाढ झाल्याचं पाहिला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला फिरायला खूप आवडतं. तो देशविदेशात आवर्जुन कुटुंबियांसोबत फिरायला जातो. World tourism day निमित्त सचिन तेंडुलकरने केला खास व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) शेअर (Share ) केला आहे. सचिनने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतला तिथले काही क्षण या व्हिडीओमध्ये पाहिला मिळतो. (sachin tendulkar trip video on social media and World Tourism Day 2022)


मास्टर ब्लास्टर (Master Blaster) या व्हिडीओमध्ये कुठे सायकरस्वारी करताना दिसतो आहे, तर कुठे समुद्राचा आनंद लुटताना तर कुठे थंडीमध्ये निसर्गाचा सान्निध्यात रमलेला दिसतं आहे. हा व्हिडीओ सचिनने आपल्या ट्वीटर (Twitter) अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओ शेअर करताना सचिनने खूप सुंदर कॅप्शन दिलं आहे. 



सचिनने लिहिलं आहे की, ''आठवणी कायम टिपल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी निसर्ग आपल्यासाठी काही तरी unique घेऊन येतं पण ते फक्त आपल्याला  एक्सप्लोर करायला हवं.''