मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आणि क्रिकेटचा देवमाणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील एक खंत व्यक्त केली आहे. मैदानावर त्याने आजवर अनेक शतकं झळवली. नाव कमवलं, क्रिकेटमधील त्याची कारकीर्द खूप गाजली पण दोन इच्छा मात्र आजही अपूर्ण राहिल्याची ही खंत आहे. इतकं सगळं यश मिळूनही आज 2 गोष्टी जर असत्या तर... अशी खंत मनात कायम राहाते त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत आज आपण जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना सांगितलं की, 'मला 2 गोष्टींसाठी कायमच खंत वाटते. सुनील गावस्कर यांना मी पाहिलंय. ते माझे बॅटिंग हिरो होते. टीममध्ये त्यांच्यासोबत खेळण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत मनात कायम आहे. गावस्कर यांनी माझ्या पदार्पणाच्या 2 वर्ष आधीच निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.


सचिन पुढे म्हणाला, माझ्या आयुष्यातील दुसरी खंत म्हणजे मला माझ्या बालपणीचा हिरो सर व्हिव्हियन रिचर्ड्स विरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळता आले नाही. 1991 साली सर रिचर्ड्सने सेवानिवृत्त झाले. 


सचिन तेंडुलकरने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय करियरमधून निवृत्ती घेतली. त्याने 200 कसोटी सामन्यात 15 हजार 921 धावा केल्या. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना खेळला होता.