मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या इतिहासातील सगळी रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. २०० टेस्ट मॅचमध्ये सचिननं ५३.७८च्या सरासरीनं १५,९२१ रन बनवले. याचबरोबर सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावण्याचा विश्वविक्रमही केला. मैदानामध्ये असो किंवा मैदानाबाहेर सचिन तेंडुलकर नेहमीच शांत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही पा्र्टी किंवा कार्यक्रमामध्ये सचिनला तुम्ही नेहमीच शांत पाहिलं असेल पण सचिन तेंडुलकरचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं सचिनच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. एका कार्यक्रमामध्ये सिद्धार्थ मल्होत्रानं सुनिल गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांना डान्स करण्याची विनंती केली. यावेळी गावसकर आणि तेंडुलकर यांनी झिंगाट या गाण्यावर डान्स केला.



याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं भारतीय क्रिकेट टीमच्या डान्सचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सेहवाग, सचिन, युवराज सिंग डान्स करताना दिसत आहेत.