Saina Nehwal retirement from Badminton : भारताची फुलराणी म्हणजेच स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालची गणना जगातील स्टार खेळाडूंसोबत केली जाते. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून सायना नेहवालला ओळखलं जातं. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्य पदकाला गवसणी घातली होती. अशातच आता भारताच्या फुलराणीविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायना लवकरत बॅडमिंटनला निरोप देण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायना नेहवाल संधीवात आणि सांधेदुखीपासून त्रस्त असून यामुळे ती निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुखण्यामुळे तिला सराव देखील करता येत नसल्याची माहिती समोर येत आहे. गगन नारंगच्या 'हाऊस ऑफ ग्लोरी' पॉडकास्टमध्ये सायनाने स्वत: याची कबुली दिली. सध्या माझ्या करियरचा शेवटचा टप्पा सुरू असल्याचं सायनाने म्हटलं आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात अनेकांना धक्का बसलाय.


सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?


मला असं वाटतं की, मी माझ्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. माझे गुडघे दुखतायेत. मला संधिवात आहे. गुडघ्याची गादी खराब झालीये. अशा परिस्थितीत मला वाटतं की, मी 8 ते 9 तास सराव करू शकत नाही. सांधे खराब करणारा आजार मला झालाय, त्यामुळे मी केवळ 2 तास जास्तीत जास्त सरावाला देऊ शकते. पण या दोन तासाच्या सरावात मी जगातील अव्वल अशी खेळाडूवर मात करू शकत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मला आता कुठंतरी स्वीकार करायला हवंय. निवृत्तीचा माझ्यावर काय परिणाम होईल यावर विचार करत आहे. पण आता काही झालं तरी निर्णय तर घ्यावाच लागेल, असं म्हणत सायनाने निवृत्तीचे संकेत दिले आहे.


एखाद्या अव्वल दर्जाच्या खेळाडूसोबत तुम्ही सामना करत असाल तर त्यासाठी मेहनत देखील तितकीच असावी लागते. मी ऑलिम्पिकमध्ये खेळणं माझं लहानपणीचं स्वप्न होतं. पण मी दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळू शकले नाही, याचं मला नेहमी वाईट वाटतं. गेली 24 वर्ष मी बॅडमिंटन खेळते, त्यामुळे निवृत्ती घेणं माझ्यासाठी नक्कीच वेदनादायी असेल, असं सायना नेहवाल म्हणाली आहे.