सायना नेहवालला पराभवाचा धक्का, कास्य पदकावर समाधान
येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला.
ग्लास्गो : येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला.
जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध झालेल्या या स्पर्धेमध्ये सायना नेहवालला पराभवाला सामोर जावे लागले. त्यामुळे आता सायनाला कास्य पदकावर समाधान मानावं लागले आहे.
नोजोमीने १२-२१, २१-१७, २१-१० अशा सरळ सेटमध्ये सायनाचा पराभव केला. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायना विरूद्ध सिंधू असा सामना पाहण्याचे भारतीयांचे स्वप्न अपूरे राहिले.
उपांत्य फेरीत सायना नेहवालने जपानच्या नाजोमी ओकुहाराविरुद्ध पहिल्या सेटमध्ये आघाडी घेत २१-१२ ने पहिला सेट जिंकला. पण त्यानंतरच्या दोन्ही सेटमध्ये सायनाला पराभव झाला.