Sakshi Malik Retirement: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) च्या निवडणुका पूर्ण झाल्या. संजय सिंह यांनी ही निवडणूक जिंकली. संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. मी कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचे साक्षीने म्हटले आहे.


नवे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या जवळचे



ब्रिज भूषण यांनी WFI च्या निवडणुका जिंकल्या आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरानचा पराभव केला आहे.  यापूर्वी ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय सिंह कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर साक्षी मलिकने आपला निर्णय जाहीर केला.