Sakshi Malik On Babita Phogat : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने माजी कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगाट हिच्या विषयी मोठा खुलासा केला आहे. साक्षीने एका मुलाखतीत सांगितले की देशातील कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जे आंदोलन केले त्याला बबिताने भडकवले कारण तिला बृजभूषण सिंहच्या जागी भारतीय कुस्ती महासंघचं अध्यक्ष व्हायचं होतं. 


बबिता फोगटने भडकवलं आंदोलन : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 च्या सुरुवातीला साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांसह अनेक दिग्गज आणि युवा कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यांच्यावर महिला खेळाडूंचे शोषण केल्याचा आरोप लावला होता. पण आता या आंदोलनाचा मुख्य भाग राहिलेली साक्षी मलिक हिने सांगितली की, माजी महिला कुस्तीपटू बबिता फोगाट ही त्या लोकांपैकी एक होती ज्यांनी हे आंदोलन अधिक भडकवण्याचा प्रयत्न केला. 


हेही वाचा : एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले मोठे अपडेट्स


साक्षी मलिकने इंडिया टुडेला मुलाखत देताना म्हटले की,  'बबितानेच कुस्तीपटूंना एकत्र करून महासंघाकडून कुस्तीपटूंना दिला जात असलेला त्रास आणि शोषणा विरोधात आंदोलन करायला सांगितले. बबिताने आमच्याशी सुद्धा संपर्क केला होता तेव्हा तिने म्हटले की, आम्ही बृजभूषण सिंह विरोधात प्रदर्शन करावे. याच्यामागे तिचा स्वतःचा अजेंडा होता. तिला भारतीय कुश्ती महासंघचं अध्यक्ष व्हायचं होतं. आंदोलन सुरु होतं त्यावेळी अशी चर्चा होती की आमच्या या आंदोलना मागे काँग्रेस आहे. पण त्याउलट भाजपच्याच दोन नेत्यांनी आम्हाला आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी मदत केली होती. हे दोन नेते बबिता आणि तीरथ राणा हे दोघे होते'. 


साक्षीने पुस्तकात केले अनेक खुलासे : 


कुस्तीपटू साक्षी मलिक हिने लिहिलेल्या  'Witness' या पुस्तकाचं प्रकाशन झालं असून या पुस्तकात साक्षीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तिने यात 2012 चा सुद्धा एक किस्सा सांगितला असून जुनिअर एशियन चॅम्पियनशिप दरम्यान बृजभूषणने तिच्या सोबत लैंगिक शोषण केल्याचा प्रयत्न केला त्यावेळी साक्षीने याचा विरोध केला आणि त्याला धक्का देऊन ती बाजूला गेली. साक्षीने बृजभूषण सिंह विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु असताना कुस्तीमधून निवृत्ती घेत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेशला काँग्रेसने आमदारकीचे तिकीट सुद्धा दिले होते ज्यात तिचा विजय सुद्धा झाला.