मुंबई: आतापर्यंत अजब प्रकारे आऊट केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले असतील पण आता आऊट की नॉटआऊट असा प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ समोर आला आहे. याचं कारण पण तसंच आहे. अंपायरनं दिलेल्या निर्णयावरून पुन्हा एकदा वाद झाला आहे. सोशल मीडियावर अजब पद्धतीनं आऊट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेट टूर्नामेंट मार्श कपमध्ये थर्ड अंपायरच्या एका निर्णयाने मोठा वाद निर्माण झाला. व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात व्हिक्टोरियाचा फलंदाज सॅम हार्परला थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे मोठा फटका बसला आणि तंबूत परतावं लागलं. 


व्हिक्टोरिया संघाच्या फलंदाजीच्या वेळी सॅम हार्परने दक्षिण ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज डॅन वॉरेलनं टाकलेला चेंडू खेळला. हा चेंडू टोलवल्यानंतर लगेचच गोलंदाजानं कॅच घेऊन रन आऊट करण्यासाठी स्टंपच्या दिशेनं फेकला. 





गोंधळात पडलेला हार्पर आऊट होऊ नये यासाठी धडपड करू लागला. त्यावरून वाद निर्माण झाला. दोन्ही संघांमध्ये बाचाबाची झाली. थर्ड अंपायरनं आऊट दिलं.


याचं कारण म्हणजे या गोंधळात बॉल हार्परच्या पायाला लागला. जेव्हा रिप्ले करण्यात आलं त्यावेळी हार्पर उभा असताना गोलंदाजानं आऊट करण्यासाठी बॉल फेकला त्यावेळी हार्पर स्टंपसमोर उभा होता असं दिसलं. त्यामुळे थर्ड अंपायरनं आऊट दिलं आहे.