मुंबई : रविवारी आयपीएल 2022 च्या 63 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार फलंदाज दीपक हुड्डा याने पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलंय. मात्र मॅच फिनीश करण्यामध्ये तो अपयशी ठरला. मात्र दीपक हुडाला बाद करण्यामध्ये कर्णधार संजू सॅमसनने मोठी भूमिका बजावली. यावेळी हुडाला बाद करण्यासाठी संजू सॅमसनला बरीच मेहनत करावी लागली आहे.


विचित्र पद्धतीने आऊट झाला हुडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या बॉलवर दीपक हुडाची विकेट गेली, तो बॉल फोर मारण्याच्या प्रयत्नात हुडा क्रीजच्या खूप पुढे आला होता. हुड्डा क्रीजपासून खूप दूर झाला होता. चहलने टाकलेला बॉल प्रथम हूडाच्या पॅडला लागला आणि नंतर थेट संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. यावेळी संजूच्या हातात बॉल आल्यावर त्याने तातडीने विकेट्स उडवल्या. 


दिपक हुडाच्या विकेटचा व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा


मात्र हुडा आऊट होता की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असतं. कारण विकेट्सच्या बेल्स संजूच्या हाताने पडल्या असाव्यात असं वाटण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे संजूने जराही धोका न पत्करता बॉल लगेच उचलला आणि यावेळी बॉल हातात घेऊन पूर्ण स्टंप उखडून काढला. 


यादरम्यान दीपक हुड्डाही फक्त घडत असलेला सर्व प्रकार पाहत राहिला आणि त्याची विकेट पडली. आपण आऊट आहोत हे त्याला माहीत होतं, त्यामुळे त्याने क्रीझवर थांबण्याचा प्रयत्नही केला नाही. अशाप्रकारे अखेर अथक प्रयत्नांनी संजू सॅमसन हुडाला आऊट करण्यात यशस्वी झाला.