मुंबई : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी आज कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या दरम्यानचं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध क्रिकेटरला अटक झाली आहे. यामुळे क्रिकेटरला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान हा खेळाडू कोण आहे? व त्याच्यावर कोणते गंभीर आरोप आहे? हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप लामिछानेला (Sandeep Lamichhane) पोलिसांनी अटक केली आहे. काठमांडू विमानतळावरून सकाळी 10  वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या अटकेनंतर संदीपने (Sandeep Lamichhane Arrested) फेसबुकवर आपली बाजू मांडली. “मी तपासाच्या सर्व टप्प्यांवर पूर्ण सहकार्य करेन आणि माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन,” असे त्याने लिहिले आहे.


क्रिकेटपटूवर आरोप काय? 
प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीपवर (Sandeep Lamichhane)  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याबाबत संदीपने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत.यामध्ये आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचे त्याने अनेकदा सांगितले. संदीपने (Sandeep Lamichhane Arrested) नुकतेच फेसबुकवर लिहिले होते की, आपण निर्दोष असून कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी पोलिसांना सहकार्य करू. या प्रक्रियेदरम्यान त्यांनी आपले वकील सोबत ठेवण्याची परवानगीही मागितली होती.


मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळ पोलीस रविवारी संदीपला (Sandeep Lamichhane) न्यायालयात हजर करण्याची तयारी करत आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी दसऱ्याच्या सुट्या आहेत. यानंतर शनिवारी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे लामिछाने यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने 23 ऑगस्ट रोजी संदीपविरुद्ध (Sandeep Lamichhane Arrested) चौकशीसाठी अटक वॉरंट जारी केले होते. आतापर्यंत तो देशाबाहेर होता. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही.


कारकिर्द 
नेपाळचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. 2018 मध्ये त्याने पदार्पण सामना खेळला होता. यानंतर त्याला 9 आयपीएल सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यांमध्ये संदीपने 13 विकेट घेतल्या. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. संदीपने 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 78 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने 30 वनडेत 69 विकेट्स घेतल्या आहेत.


दरम्यान आता या प्रकरणात संदीप लामिछानेवर (Sandeep Lamichhane) हा आरोप सिद्ध होतो की त्याची निर्दोष सुटका होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.