मुंबई : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सानियानं ३० ऑक्टोबरच्या सकाळी मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएबनं त्यांच्या मुलाचं नाव इजान मिर्झा मलिक ठेवलं आहे. इजानचा अरबी भाषेतील अर्थ देवाची भेट असा होतो. रेनबो रुग्णालयामध्ये मंगळवारी सानिया मिर्झानं मुलाला जन्म दिला. शोएब मलिकनं ट्विटरवरून याची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आम्हाला मुलगा झाला हे सांगताना आनंद होत आहे. पत्नीची तब्येत चांगली आहे. तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.. असं ट्विट शोएब मलिकनं केलं आहे. १२ एप्रिल २०१० साली शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचं लग्न झालं होतं.


सानिया मिर्झानं मुलासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सानिया आणि इजान शोएब मलिक खेळत असलेली मॅच बघत आहेत. शोएब मलिक सध्या न्यूझीलंडविरुद्ध २ टी-२० मॅचची सीरिज खेळत आहे. यातलीच मॅच बघतानाचा फोटो सानियानं इन्स्टाग्रामवरून शेअर केलाय. या फोटोमध्ये शोएब मलिक बॅटिंग करताना दिसत आहे.



याचबरोबर सानियानं ३ वेगवेगळ्या आकाराच्या बुटांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. सानियानं तिला आणि शोएबला शुभेच्छा देण्याऱ्या सगळ्यांचे आभारही मानले आहेत.