Sania Mirza and Shoaib Malik: असं काय झालं की..! सानिया मिर्झानं दिलेल्या शुभेच्छा चर्चेत, `तू जवान दिसत...`
Sania Mirza and Shoaib Malik Divorce: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक (Sania Mirza and Shoaib Malik) यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वैवाहिक जीवनात खडा पडल्याच्या चर्चा रंगली आहे.
Sania Mirza Shoaib Malik Divorce: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक (Sania Mirza and Shoaib Malik) यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वैवाहिक जीवनात खडा पडल्याच्या चर्चा रंगली आहे. लवकरच घटस्फोट होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. सानिया मिर्झाने 12 एप्रिल 2010 रोजी शोएब मलिकशी लग्न केलं होतं. त्यानंतर सानियाने 31 ऑक्टोबर 2018 रोजी इजहानला जन्म दिला होता. घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली असताना सानिया मिर्झाचा जुनी इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सानिया मिर्झानं पती शोएब मलिक खास शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या.
"हॅप्पी बर्थडे टू टू फ्रॉम अस, तू वाढत्या वयासोबत जवान दिसत आहेस. यामुळे माझ्यासह सर्वांनाच कॉम्प्लेक्स येत आहे." अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर (Sania Mirza instagram) केली होती. त्याचबरोबर मुलगा इजहान मिर्झासह फोटो पोस्ट केला होता.
सानिया मिर्झाने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मला सर्वात कठीण दिवसातून घेऊन जाणारे क्षण.' फोटोमध्ये सानिया मिर्झा आणि तिचा मुलगा दिसत आहे. तसेच निळ्या रंगाचा हार्ट इमोजी टाकला आहे.
पाकिस्तान मीडियाने शोएबनं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा बातम्या दिल्या आहेत. मात्र असं असलं तरी दोघांनी याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाही.