Sania Mirza Australian Open 2023: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) यांच्या जोडीचा Australian Open 2023 च्या अंतिम फेरीत पराभव झाला आहे. यामुळे सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांचं स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. सेमीफायनल सामन्यात Neal Skupski आणि Desirae Krawczyk यांचा पराभव करत सानिया आणि रोहन अंतिम फेरीत पोहोचले होते. दरम्यान पराभव झाला असला तरी सोशल मीडियावर सानिया मिर्झा चर्चेत असून मुलासोबतचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया मिर्झाच्या सेमीफायनल सामन्यात तिचा मुलगाही उपस्थित होता. मुलगा प्रेक्षकांमध्ये असल्याने सानियासाठी हा सामना खास होता. सेमीफायनल जिंकताच सानियाचा मुलगा इझान मलिक धावत आपल्या आईकडे आला होता. सानियानेही त्याला मिठी मारत उचलून घेतलं आणि चुंबन घेत आनंद साजरा केला. सानिया आणि तिच्या मुलाचा सेलिब्रेशन करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


सानियासह मैदानात असणाऱ्या बोपन्नासाठीही हा क्षण खास होता. एकीकडे सानिया आपल्या मुलासह सेलिब्रेशन करत असताना दुसरीकडे बोपन्नाही आपल्या मुलीसह क्षण साजरा करत होते. 



अंतिम फेरीत पराभव


सानिया मिर्झाला आपल्या अखेरच्या ग्रँड स्लॅममध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी ब्राझीलच्या लुइसा स्टेफनी आणि राफेल मोटोस यांनी 6-7, 2-6 ने पराभूत केलं. या पराभवासह सानियाचं स्वप्न भंगलं आहे. आपल्या अखेरच्या ग्रँड स्लॅमचा विजयी शेवट करण्याची सानियाची इच्छा होती. पण तसं होऊ शकलं नाही. सानियाचा मुलगा इझान यावेळीही उपस्थित होती. आपल्या मुलासमोर अंतिम सामना खेळणं फाल मोलाचा क्षण होता असं सानियाने सांगितलं आहे. सानिया मिर्झाने हा आपला अखेरचा ग्रँड स्लॅम असेल असं आधीच जाहीर केलं होतं. 


"माझ्या मुलासमोर मी ग्रँड स्लॅम फायनल खेळेन असा विचार मी कधीच केला नव्हा. त्यामुळेच माझा चार वर्षांचा मुलगा, आई-वडील आज येथे उपस्थित असणं माझ्यासाठी फार खास आहे," अशा भावना सानियाने व्यक्त केल्या आहेत.


सानिया मिर्झाने वयाच्या 14 व्या वर्षी सर्वात प्रथम दुहेरी प्रकारात भाग घेतला होता. यावेळी रोहन बोपन्ना तिचा प्रथम जोडीदार खेळाडू होता. दोघांनीही राष्ट्रीय विजेतेपद जिंकलं होतं. पण 22 वर्षीय जुनी ही जोडी अखेरचा ग्रँड स्लॅम जिंकण्यात अपयशी ठरली आहे.