नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने अलीकडेच अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये हजेरी लावली. 'नो फिल्टर नेहा' या शो मध्ये तिने आपल्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टी देखील मनमोकळेपणाने शेअर केल्या. त्यात तिने सांगितले की, माझ्या नातेसंबंधांबद्दल मी खूप पजेसिव्ह आहे. त्याचबरोबर तिने आपले रिलेशनशिप आणि वैवाहिक आयुष्य याबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर सानिया म्हणाली की, "तिला चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजन सीरिअल्स अधिक आवडतात." एक वेळ अशी होती की, ती टीव्ही वरील मालिका  'बालिका वधू'च्या अत्यंत प्रेमात होती. तिला ती मालिका इतकी आवडायची की, ती विम्बल्डन वेळेस देखील मिळेल त्या वेबसाईटवर ऑनलाईन ती मालिका बघायची. 


तर अनेकदा ती मॅचेस निमित्त बाहेरगावी असताना आईला फोन करून मालिकेबद्दल विचारायची. सानिया आपल्या आईसोबत 'बालिका वधू' ही मालिका बघायची. तेव्हापासूनच तिला ही मालिका आवडू लागली आणि त्या मालिकेशी तिचे नाते तयार झाले.