मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांना गेल्या महिन्यात मुलगा झाला. या मुलाचं नाव 'इझान मिर्झा मलिक' ठेवण्यात आलं. या बाळाचा पहिला फोटो सानियाने शेअर केला आहे. सानियाने ट्विटरवर बुधवारी हा फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ एप्रिल २०१० रोजी सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह झाला होता. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी या गोंडस मुलाने जन्म घेतला आहे. या बाळाच्या जन्मामुळे सानिया बराचकाळ आपल्या खेळापासून दूर राहिलेली आहे. 




सानिया मिर्झाने आपला जीम गेल्याचा फोटो देखील ट्विटरवर शेअर केला होता. मुलाच्या जन्मानंतर अगदी पंधरा दिवसांतच सानिया जिममध्ये गेली. मी खूप उत्साही आहे. जसं एखादं लहान मुलं दुकानात जायला उत्साही असतं अगदी तसंच. ही मानसिक आणि शारीरिक रूपात खूप चांगली वापसी आहे. याची शुरूवात मी माझ्या वाढदिवसादिवशीच केली आहे. 



माजी डबल्स वर्ल्ड नंबर १ सानिया मिर्झा ही ऑक्टोबर २०१७ पासून टेनिस पासून दूर होती. सहा ग्रँड स्लॅम दुहेरी स्पर्धांचे विजेतेपद तिने मिळवले आहे. आता सानियाने २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली.