Sania Mirza Shoaib Malik Love Story: पहिल्या भेटीत इग्नोर...पण नंतर असं जडलं प्रेम!
Sania Mirza Instagram Post : सानिया शोएबची लव स्टोरी (Love story) कशी सुरू झाली? दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय झालं होतं?
Sania Mirza Shoaib Malik: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्यातील घटस्फोटाची एकच चर्चा होताना दिसत आहे. सानियाने सोशल मीडियावर (Sania Mirza Instagram Post) अलिकडे केलेल्या एका पोस्टवरून त्यांच्यातल्या दुराव्याची चर्चा होताना दिसते. 'वो पल जो मुझे सबसे मुश्किल दिनों से ले आते है', तसंच टुटे हुए दिल कहा जाते हैं' , अशी पोस्ट तिने केली होती. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. मात्र, या दोघांची लव स्टोरी (Love story) कशी सुरू झाली? दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय झालं होतं?
पहिल्या भेटीचा किस्सा...
एका पाकिस्तानी शोमधील इंटरव्हयूमध्ये (Sania Mirza Shoaib Malik Interview) शोएब आणि सानिया या दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीवर एक किस्सा सांगितला होता. शोएब आणि सानिया यांची पहिली भेट 2003 मध्ये झाली होती. त्यावेळी सानियाने त्याला भाव देखील दिला नव्हता. त्यावर बोलताना सानिया म्हणते, त्यावेळी क्रिकेटर्सची इमेज कशी होती, सर्वांना माहित होतं. त्यामुळे आम्ही गप्प बसत होतो, असं सानियाने म्हटलं होतं.
शोएब आणि सानिया यांच्यात पुन्हाल 6 वर्ष भेट झाली नाही. दोघांना एकमेकांबद्दल माहिती होतं. त्यानंतर 2009 मध्ये त्यांची पुन्हा भेट झाली ती ऑस्ट्रेलियात... ऑस्ट्रेलियाच्या होबर्डमध्ये त्यांची भेट झाली अन् तिथून बोलणं चालू झालं. त्यानंतर भेटीगाठी झाली आणि दोघांनी लग्न (Sania Mirza Shoaib Malik marriage) करायचं ठरवलं. दोघांनी 2010 मध्ये धुमधडाक्यात लग्न केलं. पारंपारिक संस्कृतीप्रमाणे दोघांनी हैद्राबादमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2018 मध्ये मुलगा इजहान जन्म झाला.
आणखी वाचा- भारताची सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्यात 'तलाक'?, सानियाची पोस्ट व्हायरल!
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी (India Pakistan Match) सानियाला प्रश्न विचारण्यात आला होता. भारत पाकिस्तान सामन्यात तू कोणाला सपोर्ट करतेस?, असा सवाल विचारल्यावर तिने लगोलग उत्तर दिलं. सामना भारताने जिंकावा, पण माझ्या नवऱ्याचं शतक व्हावं, असं ती म्हणाली. त्यानंतर सामना असतो, तेव्हा तू सोफ्यावर बसून रहा, असा सल्ला देखील सानिया शोएबला देते, असंही ती म्हणाली होती.