`लग्न, घटस्फोट कठीण पण...` अखेर सानिया मिर्झाने सोशल मीडियातून मांडली भूमिका
Sania Mirza Post: सानिया मिर्झाची इन्स्टा स्टोरी पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता पुन्हा रंगू लागल्या आहेत.
Sania Mirza Post: भारतीय टेनिस प्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शोएब मलिक यांच्या नात्यामध्ये कटुता आल्याच्या चर्चा गेल्या 2 वर्षांपासून सुरु आहे. 2022 नंतर दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अंतर येऊ लागल्याच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यापैकी कोणीही यावर स्पष्टपण बोलत नाहीत. असे असले तरी दोघेही समाज माध्यमातून आपल्या सध्याच्या रिलेशनशीप स्टेट्सवर हिंट देत असतात. या पार्श्वभूमीवर सानिया मिर्झाने लग्न आणि घटस्फोटासंबंधी इंस्टास्टोरीवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केलीय.
सानिया मिर्झाची इन्स्टा स्टोरी पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता पुन्हा रंगू लागल्या आहेत.
काय म्हणाली सानिया?
सानियाने या पोस्टमधून बरच काही स्पष्ट केलं आहे. लग्न कठीण आहे. घटस्फोट कठीण आहे. आपला कठीण रस्ता निवडा. स्थूलता कठीण आहे. फिट राहणे कठीण आहे. आपला कठीण रस्त्या निवडा. कर्जात राहणं कठीण आहे. आर्थिक शिस्त कठीण आहे. आपला कठीण रस्ता निवडा. बोलणं कठीण आहे. न बोलणंही कठीण आहे. आपलं कठीण निवडा. आयुष्य कधीच सोपं नसतं. ते नेहमीच कठीण असतं. पण आपण आपला कठीण रस्ता निवडू शकतो. समजदारीने निवडा.
सानियाने ही पोस्ट लिहून आपल्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब तर केलं नाही ना? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सानिया आणि शोएबचा मुलगा इजानने स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर दोघांनी एकत्र येत सेलिब्रेशन केले होते. एवढेच नव्हे तर दोघांनी एकत्र येत त्याचा वाढदिवस साजरा केला होता. यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. पण आता सानिया मिर्झाच्या नव्या इन्स्टा स्टोरीमुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
सानिया मिर्झासोबत शोएबचं दुसरं लग्न
सानिया मिर्झासोबत लग्न करण्याआधी शोएब मलिकने आयशा सिद्दीकीसोबत लग्न केले होते. सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या काही दिवस आधीच त्याने आयशा सिद्दीकीसोबत घटस्फोट घेतला होता. आयशाही हैदराबादची असून एक शिक्षिका आहे. शोएबने आयशाला 15 कोटी रुपये देऊन घटस्फोट दिला.