Sania Mirza: भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा जोडीदार हमवतन रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) यांना ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटच्या (Australian Open Final) मिक्स डबल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानुसार सानिया मिर्झा ग्रँड स्लॅमच्या (Grand Slam) करियरमध्ये शेवटचा खिताब जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलेली नाही. सानियाच्या तिच्या करियरमध्ये सहा ग्रँड स्लॅमचे खिताब जिंकले आहेत. तर बोपण्णाने फ्रेंच ओपनच्या रूपात मिक्स्ड डबल्सचा खिताब जिंकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया आणि रोहन यांच्या जोडीला फायनलच्या सामन्यात लुइसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राझील जोडीकडून पराभव स्विकारावा लागला. या जोडीने भारताचा 6-7 (2) 2-6 असा पराभव केला. फायनलच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सानिया मिर्झाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. फेब्रुवारीमध्यो दुबईमध्ये होणारी डब्ल्यूटीए टूर्नामेंट तिच्या करियरमधील शेवटचं टूर्नामेंट असल्याचं तिने सांगितलं आहे.


पराभवानंतर सानिया मिर्झा भावूक


पराभवानंतर रोहन बोपण्णाने सानियाला तिच्या उत्कृष्ट खेळाबाबत आणि करियरबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी सानिया तिचे अश्रू रोखू शकली नाही. 


बोपण्णाच्या म्हणण्याप्रमाणे, सानियाने देशातील अनेक तरूणांना खेळा प्रति प्रोत्साहित केलं आहे. ज्यावेळी बोपण्णा सानियाचं कौतुक करत होता त्यावेळी सानिया भावूक झाली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 



डोळ्यात अश्रू तरळले असतानाच स्वतःला सांभाळत सानियाने माईक हाती घेतला आणि सर्वांचे आभार मानले. सोबतच तिने विजेच्या टीमला शुभेच्छा देखील दिल्या. सानिया म्हणाली, माझं प्रोफेशनल करियर मेलबर्न पासून 2005 मध्ये सुरु झालं. त्यामुळे ग्रँड स्लॅमच्या करियरला अलविदा म्हणण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली जागा नाही.  


अश्रू पुसत सानिया म्हणाली, मी इथे जेव्हा सेरेना विलियम्सविरूद्ध खेळली होती, तेव्हा मी 18 वर्षांची होती. 18 वर्षांपूर्वी कॅरोलिनाविरूद्ध खेळली होती. इथे खेळणं नेहमी माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट राहिली आहे. हे माझ्या घरासारखं आहे.


सानियाने मिक्स डबल्समध्ये 3 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सानियाच्या सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदांपैकी तीन मिक्स डबल्स आहेत, जे तिने महेश भूपती (2009 ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 फ्रेंच ओपन) आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस (2014 यूएस ओपन) सोबत जिंकले.