मुंबई : भारतीय टेनीस स्टार सानिया मिर्झा होणाऱ्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी खूपच आनंदात आहे. जेव्हापासून तिने आपल्या प्रेग्नेंसीची बातमी दिली तेव्हापासून तिच्या होणाऱ्या बाळाचीचं माध्यमांत चर्चा आहे. बेबी शॉवरमध्ये सानियाने घातलेल्या ड्रेसमुळे सोशल मीडियात ती ट्रोल होतेयं. खरंतर सानिया मिर्झाचं हा दुसरा बेबी शॉवर कार्यक्रम होता. यावेळेस सानियाने पती शोएबसोबत बेबी शॉवर कार्यक्रमात सहभाग घेतला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी झालेल्या पहिल्या बेबी शॉवर कार्यक्रमात मॅचमुळे शोएब सहभागी झाला नव्हता. सानियाचं पहिलं बेबी शॉवरही जरा हटके स्वरूपाचं होतं. त्या सोहळ्यात सानियानं एलिमल थीमचा ड्रेस घातला होता.



त्यावेळी सानियाने शोएबची खूप आठवण काढल्याचं म्हटलं जातं.


सानिया ट्रोल



यावेळचा दुसरा बेबी शॉवर हैदराबादमध्ये झाला. याठिकाणी राजस्थानी पद्धतीचं जेवणं ठेवलं होत.



आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे सानिया खूप ट्रोल झाली.



सोशल मीडियातून सानियाचे फोटो समोर आल्यानंतर युजर्सनी ट्रोल करायला सुरूवात केली.


या ड्रेसमध्ये सानिया खूप जाडी दिसतेय असं युजर्सनी म्हटलं.


खूपच उत्साहात


गर्भावस्थेमुळे शरीरात आलेल्या बदलामुळे सानिया थोडीशी जाड दिसत आहे.


अनेकांनी तिच्या या फोटोचं कौतूकही केलंय. या कार्यक्रमात केकही कापण्यात आला.


'बेबी मिर्झा मलिक' असं या केकवर लिहिलं होतं. प्रेग्नेंसीदरम्यान ती खूपच उत्साहात दिसतेय.


तसं तर ती नेहमीच सोशल मीडियात अॅक्टीव्ह असते पण सध्या प्रेग्नेंसीतही ती आपल्या अधिकृत अकाऊंटवरून खूप सुंदर फोटो शेअर करत असते.