मुंबई: लखनऊ विरुद्ध बंगळुरू सामना अत्यंत रोमांचक झाला. 18 धावांनी बंगळुरूने लखनऊचा पराभव केला. हा सामना बंगळुरूसठी दोन अर्थानं विशेष ठरला. पहिलं तर हा सामना जिंकल्याने आणि दुसरं म्हणजे त्यांना चिअर्स करण्यासाठी चक्क KGF 2 सिनेमाची टीम स्टेडियमवर पोहोचली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन बंगळुरूच्या जर्सीमध्ये स्टेडियममध्ये दिसली. हे दोघंही बंगळुरू टीमला चिअर्स करत होते. यावेळी संजय दत्तने बंगळुरूच्या जर्सीवर लिहिलेलं नाव विशेष चर्चेत आलं. 


अधीरा असं त्याने घातलेल्या जर्सीवर नाव होतं. KGF 2 सिनेमात संजय दत्तने अधीराची भूमिका साकारली आहे. तर रवीनाचा छोटा रोल आहे. हे दोघंही मॅच पाहण्यासाठी KGF 2 च्या टीमसोबत आले होते. यावेळी त्यांनी फ्रॅन्चायझीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 


बंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करून 181 धावा केल्या. लखनऊला विजयासाठी 182 धावांचं आव्हान होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना 18 धावा कमी पडल्या. कॅप्टन के एल राहुलच्या टीमचा पराभव झाला आहे. बंगळुरूच्या जोश हेजलवुडने 4 विकेट्स घेतल्या.