Sanjay Manjrekar On Prasidh Krishna : साऊथ अफ्रिका आणि भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या सेंच्युरियन कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी एक डाव आणि 32 धावांनी दारूण पराभव झाला. त्यामुळे मालिका विजयाचं स्वप्न अखेर अपूर्णच राहिलंय. मालिकेत आता साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली. त्याचा फटका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) टीम इंडियाला धक्का बसलाय. अशातच आता टीम इंडियाच्या गोलंदाजावर माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले Sanjay Manjrekar ?


जर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) संघातून बाहेर जात असेल तर हे चुकीचं ठरेल. त्याला आणखी संधी देण्याची गरज आहे. आधी कोहली आणि रवी शास्त्री यांच्या काळात असे निर्णय घेतले जात होते. मात्र, आता राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यासारखं काम करण्याचा पर्याय उपलब्ध नसेल. मला असं वाटतं की, या नव्या खेळाडूला आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी आणखी संधी देण्याची गरज आहे. मात्र, सध्या ही दोन टेस्टची मालिका असल्याने संघात बदल होतील, असंच दिसतंय, असं संजय मांजरेकरांनी म्हटलं आहे.


प्रसिद्ध कृष्णाला पहिल्याच टेस्ट सामन्यानंतर संघातून बाहेर बसवणं थोडं अवघड असणार आहे. जर तुम्ही पाहिलं तर तो एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने आपल्या उंचाचा उपयोग करून शॉर्ट बॉल करू शकतो. त्यामुळे त्याने पहिल्या सामन्यापासून आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे, असं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.


आणखी वाचा - शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये फ्लॉप का होतोय? सुनिल गावस्करांनी करेक्ट सांगितलं, म्हणतात...


दरम्यान, टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सराव करत असताना शार्दुल जखमी झाला होता. त्यामुळे आता आगामी सामन्यात तो खेळेल की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. अशातच जर शार्दुल खेळला नाही तर प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येतील.