Sunil Gavaskar statement On Shubman Gill : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसतात. मात्र, साऊथ अफ्रिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांचा टिकाव लागत नाही. रोहित शर्माच नाही तर अनेक खेळाडूंना साऊथ अफ्रिकन पीचवर पाय रोवता येत नाही. अशातच आता टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) देखील साऊथ अफ्रिकेविरुद्ध धावा करू शकला नाही. सेंच्युरियन कसोटी सामन्यात गिलला केवळ 28 धावा करता आल्या होत्या. एवढंच नाही तर मागील अनेक कसोटी सामन्यात शुभमन फेल ठरतोय. त्याचं नेमकं कारण काय? यावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले सुनिल गावस्कर?
मला वाटतं की शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये खूप आक्रमक खेळत आहे. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेट थोडं वेगळं आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये बॉलचा फरक असतो. लाल चेंडू हवेत आणि खेळपट्टीबाहेर, पांढऱ्या चेंडूपेक्षा थोडा जास्त स्विंग होतो. लाल चेंडूही थोडा अधिक उसळी देतो. त्यांनी या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. शुबमन गिलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात चांगली केली आणि आम्ही त्याच्या शॉट्सचं कौतुक केलं. तो त्याच्या फॉर्ममध्ये परत येईल, अशी आशा आपण करू शकतो. भविष्यात तो कठोर परिश्रम करेल आणि चांगली कामगिरी करेल अशी आशा देखील गावस्कर यांनी व्यक्त केलीये.
दरम्यान, शुभमन गिलने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यांत 31.06 च्या सरासरीने 994 धावा केल्या आहेत आणि 2 शतके आणि 4 अर्धशतके आहेत. शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील शेवटचं शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलं होतं. त्यानंतर त्याला कसोटीच्या मैदानात टिकता आलं नाही.
भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.