प्रिटोरिया :  दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय एकदिवसीय क्रिकेट सिरीजमध्ये भारताच्या अ संघाने  दक्षिण आफ्रिकेचा एक विकेट राखून पराभव केला. पण या सामन्यात संजू सॅमसनने एक जबरदस्त कॅच घेतला. त्याने जॉन्टी रूट्सची आठवण करू दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजूने हा शानदार कॅच जॉन्टी रूट्सच्या जमिनीवर घेतल्याने याला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. जॉन्टीने आपल्या फिल्डिंगमुळे ओळख बनवली आणि क्रिकेटच्या इतिहासात नाव कोरले. 


दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २५ व्या षटकात यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ड्वेन प्रीटोरियसने शॉट खेळला. पण संजू सॅमसंगने उलट्या दिशेने पळत बाऊंड्रीजवळ असा शानदार कॅच पकडला की फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. 


 



संजूचा हा कॅच क्रिकेटच्या इतिहासातील बेस्ट कॅच मानला जात आहे. तुम्ही हा कॅच पाहिला नाही तर काही तर मिस कराल ..