फोटोशूटदरम्यान Sanju Samson चा भर मैदानात अपमान? बसलेल्या खुर्चीवरून उठवलं आणि...!
बीसीसीआयवर संजूला संधी देण्याबाबत आणि त्याच्याशी योग्य वर्तन न करण्याबाबत टीकाही करण्यात आली. अशातच आता सोशल मीडियावर फोटो व्हायरल (Photo Viral) झालाय, ज्यामध्ये संजूसोबत पक्षपात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय.
Sanju Samson : टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) न्यूझीलंडच्या (INDvsNZ) दौऱ्यावर केवळ 1 सामना खेळणयाची संधी मिळाली. संजूला संधी न दिल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला. यानंतर बीसीसीआयवर त्याला संधी देण्याबाबत आणि त्याच्याशी योग्य वर्तन न करण्याबाबत टीकाही करण्यात आली. अशातच आता सोशल मीडियावर फोटो व्हायरल (Photo Viral) झालाय, ज्यामध्ये संजूसोबत पक्षपात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय.
Sanju Samson ला फोटोशूट दरम्यान खुर्चीवरून उठवलं
टीम इंडियाने 30 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडच्या दौऱ्यावरील शेवटचा सामना खेळला. 3 सामन्यांची वनडे सिरीज संपल्यानंतर सर्व सदस्य सपोर्ट स्टाफ एकत्र फोटो काढत होते. संपूर्ण टीमसोबत संजू (Sanju Samson) देखील तिथे आला. यावेळी हेड कोच व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्णधार शिखर धवन आणि उपकर्णधार ऋषभ पंत पुढच्या खुर्च्यांवर जाऊन बसले.
यावेळी संजू पहिल्यांदा पुढे बसायला गेला, मात्र त्याचवेळी त्याला मागच्या बाजूला बसण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीवर दुसरी व्यक्ती येऊन बसली. ज्यामुळे संजूला उभं राहूनच फोटो काढावा लागला. याचवेळी कोच लक्ष्मण आणि पंत हसत असताना कॅमेरातमध्ये कैद झाले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजूची पंतशी होतेय तुलना
संजू सॅमसनने न्यूझीलंडच्या दौऱ्यावर फक्त एकच सामना खेळला, ज्यामध्ये त्याने चांगल्या धावा केल्या. मात्र यानंतर त्याला बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांकडून पंत आणि सॅमसनची तुलना केली जात आहे.
भारतीय संघात संजू सॅमसन हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने 2015 पूर्वी पदार्पण करुनही आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नाही. मात्र ऋषभ पंतने 2019 चा विश्वचषकात फक्त 5 एकदिवसीय सामने खेळूनही त्याला खेळवले जात आहे. त्याची आकडेवारी देखील चांगली नव्हती त्यामुळे संघ निवडीत पक्षपात होत असल्याचे म्हणत आहेत.