केरळ : केरळचा क्रिकेटर संजू सॅमसनने शनिवारी आपली प्रेयसी चारुलतासोबत विवाह केला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो राजस्थानकडून खेळणारा सॅमसन आणि चारुलता हे एकत्र कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनी कोवालममध्ये विवाह केला. 24 वर्षाच्या सॅमसनने म्हटलं की, 'दोघांच्या कुटुंबियांमधून 30 जण या लग्नाला उपस्थित होते. मित्र आणि क्रिकेट खेळाडूंसाठी संध्याकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसनने म्हटलं की, 'आम्ही खुश आहोत की, दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांच्या शुभेच्छा मिळाल्या.' सॅमसन ख्रिश्चन आहे. तर त्याची पत्नी चारु हिंदू आहे. संजूने पिवळा कुर्ता आणि धोती घातली होती. तर चारुलताने साडी घातली होती. 



संजू सॅमसनने आयपीएलने आतापर्यंत 26.67 च्या रनरेटने 1867 रन केले आहेत. ज्यामध्ये एक शतक देखील आहे. आयपीएल-10 मध्ये तो दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळत होता. संजू सध्या राजस्थान टीममध्ये आहे. राजस्थानने 8 लाखांमध्ये त्याला खरेदी केलं होतं. याआधी संजूवर दिल्लीने 2016 मध्ये 4.2 कोटी रुपयांची बोली लावली.