Yuvraj Singh on T20 World Cup 2024: टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि वर्ल्ड कप विनर युवराज सिंग (Yuvraj Singh) यंदा टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. युवराज सिंगने आपल्या ऑलराऊंडर कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून दिलाय. तर 2007 सालचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकवण्यात देखील युवराजचा मोठा हात राहिलाय. अशातच आता युवराज सिंगने टीम इंडियाच्या सिलेक्शनवर भाष्य केलंय अन् काही खेळाडूंचं कौतूक देखील केलंय. त्यावेळी त्यांनी टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असावा? यावर उत्तर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसन की ऋषभ पंत?


टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा युवराजने स्पष्ट उत्तर दिलं. मी कदाचित ऋषभसोबत जाईन. अर्थात, संजू देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, परंतु ऋषभ (Rishabh Pant) डावखुरा आहे आणि मला विश्वास आहे की ऋषभमध्ये भारतासाठी खेळ जिंकण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांनी आधीही अशी कामगिरी करून दाखवलीये. तो असा खेळाडू आहे, जो मोठ्या सामन्यात तुम्हाला चांगली कामगिरी करून दाखवू शकतो, असं युवराजने म्हटलं आहे. संजूने (Sanju Samson) देखील अफलातून कामगिरी केलीये. त्यामुळे टीम इंडियाला नक्कीच त्याचा फायदा होईल, असा विश्वास देखील युवराज सिंगने (Yuvraj Singh) व्यक्त केलाय.


हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली नाही तरी देखील त्याला टीम इंडियात स्थान मिळालं. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. पण हार्दिक पांड्यासाठी फिटनेस एक महत्त्वाचा विषय असेल. तो टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विशेष कामगिरी करेल, असा विश्वास देखील युवराजने यावेळी व्यक्त केलाय. आयपीएलमध्येही शिवम दुबेनं सातत्य राखलंय. त्याचा सध्याचा फॉर्म बघता तो संघात असणं महत्त्वाचं होतं, असं मला वाटतं. मिडल ऑर्डरमध्ये किंवा खालच्या फळीत तो खूप मोठा बदल घडवून आणू शकतो, असंही युवराजने म्हटलं आहे.


टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.