T20 वर्ल्डकपमधील संघातून डावलल्याने Sanju Samson नं दिली प्रतिक्रिया, म्हणाला `मी आता...`
टी 20 वर्ल्डकपसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. मात्र संघात केरळचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनला डावलल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे
India Squad for T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. मात्र संघात केरळचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनला डावलल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या यष्टिरक्षक-फलंदाजाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. परंतु त्याने आतापर्यंत फक्त सात एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
टी 20 वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर संजू सॅमसनने आपलं मत व्यक्त केलं आहे. "भारतीय संघात स्थान मिळवणे हे प्रत्येक खेळाडूसाठी मोठे आव्हान आहे. आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन."सॅमसनने संघ व्यवस्थापनाला दोष देण्याऐवजी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीच्या स्पर्धेकडे लक्ष वेधले. संजू सॅमसनने सांगतिलं की, संघात स्थान मिळवणे खरोखरच आव्हानात्मक आहे. परंतु स्वतःवर लक्ष केंद्रित करत आणखी सुधारणा करायची आहे.
Team India: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर 3 स्टार का आहेत? यामागे आहे खास कारण
27 वर्षीय संजू सॅमसनने 'द वीक'ला सांगितले, 'भारतीय संघात स्थान मिळवणे खरे तर मोठे आव्हान आहे. संघात उपस्थित असलेल्या खेळाडूंमध्येही खूप स्पर्धा आहे. जेव्हा या गोष्टी घडतात, तेव्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. मी ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे त्यावरून मी खूश आहे. मला फक्त अजून सुधारणा करायची आहे.' सॅमसनने पुढे सांगितलं की, 'मला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याचा आत्मविश्वास आहे. तुम्ही स्वतःसाठी जागा निश्चित करू नये. मी सलामीवीर आहे की फिनिशर आहे हे तुम्ही लोकांना सांगू शकत नाही.'