मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) याची मुलगी सारा तेंडूलकरने (sara tendulkar)  नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सारा तेंडूलकर तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. या निमित्त सारा तेंडूलकरचा जन्म आणि सचिनच्या 25 व्या शतकाचं कनेक्शन जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : Urfi Javed चे थ्रोबॅक फोटो आले समोर, Photo पाहून ओळखताही येणार नाही


सारा तेंडूलकरने (sara tendulkar) 12 ऑक्टोबर रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. तिने यावर्षी बुडापेस्ट, हंगेरी येथे तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. सारा तिच्या मैत्रिणींसोबत येथे पोहोचली आणि तिचा वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 


सचिनच्या 25 व्या शतकाशी कनेक्शन 


सारा तेंडुलकरचा (sara tendulkar) जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. आता ती 25 वर्षांची आहे. यंदा तिचा वाढदिवस आणि वडील सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांच्या शतकांबाबत एक विचित्र योगायोग घडला आहे. हा योगायोग जाणून चाहत्यांनाही आश्चर्य वाटेल.


हे ही वाचा : अरबाज खानच्या गर्लफ्रेंडच बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क


जेव्हा साराचा (sara tendulkar) जन्म ऑक्टोबर 1997 मध्ये झाला होता, त्यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये 25 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली होती. 9 ऑगस्ट 1997 रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत मास्टर ब्लास्टरने त्याचे 25 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.


वनडे-टेस्टमध्ये ठोकले शतक


ऑक्टोबर 1997 मध्ये मुलगी साराच्या (sara tendulkar) जन्मापूर्वी सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) वनडे फॉरमॅटमध्ये 12 आणि टेस्टमध्ये 13 शतके झळकावली होती. त्यामुळे त्याने साराच्या जन्मापुर्वी 25 शतक ठोकली होती. हे खास कनेक्शन आहे बाप-लेकीमध्ये. हे कनेक्शन एकूण अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.  


सारा तेंडूलकर (sara tendulkar) सोशल मीडिया सेन्सेशन आहे. साराने अलीकडे अनेक फोटोशूट आणि अॅडशूट देखील केले आहेत. सारा तेंडुलकर लवकरच बॉलीवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत, परंतु अद्याप याविषयी कोणतीही पुष्टी झालेली नाही.